मनमाड : शिवसेना महिला आघाडी मनमाड शहर च्या वतीने आज मनमाड पोलीस स्टेशन येथे सर्व पोलिस अधिकारी व पोलीस बांधवांना राखी बांधण्यात आली.
आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुम ताई कांदे यांच्या मार्गदर्शनात आज सर्व शिवसेना महीलंनी मनमाड पोलीस स्टेशन येथे जात , उपस्थित पोलीस अधिकारी व पोलीस बांधवांना राखी बांधली.या प्रसंगी विद्या जगताप संगीता बागुल, पूजा छाजेड, सरला घोगळे, नाजमा मिर्झा, सुरेखा ढाके, अलका कुमावत, नीता लोंढे प्रतिभा अहिरे, वंदना शिंदे, राधा मोरे, सविता दुबे, जयश्री देठे, शिरीन खान, छाया कोकाटे उपस्थित होत्या. शिवसेना महिला आघाडी तर्फे आमदार सुहास अण्णा कांदे जनसंपर्क कार्यालय, मनमाड येथे शिवसेना पदाधिकारी यांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधण्याचा कार्यक्रम करण्यात आला.या प्रसंगी माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, किशोर लहाने,अंकुश काकडे, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले, मुकुंद झाल्टे,लोकेश साबळे,सचिन दरगुदे,कुणाल विसापूर्कर, निलेश व्यवहारे उपस्थित होते.









