Home Breaking News आमदार आपल्या दरी अभियान अंतर्गत नागरिकांना रेशन कार्ड व दाखल्यांचे वाटप

आमदार आपल्या दरी अभियान अंतर्गत नागरिकांना रेशन कार्ड व दाखल्यांचे वाटप

0

मनमाड : आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून मनमाड शहरातील विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या आमदार आपल्या दारी या कार्यक्रमातील रेशन कार्ड, डोमसियल, जातीचा दाखला, प्रकरण जमा केले होते, त्या दाखल्यांचे (150) आज आमदार कार्यालय येथे शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.आमदार आपल्या दारी या उपक्रम अंतर्गत मोठ्या संख्येने नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला. यात नागरिकांचे शासकीय कार्यालयात होणाऱ्या चकरा आणि लांबनारे काम पाहता एकच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.या प्रसंगी सर्व शिवसेना,युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक यांनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here