Home Breaking News आव्हाने येथिल निद्रिस्त गणपती मंदिरात हरिदास पालवे यांच्या संस्कृत किर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध

आव्हाने येथिल निद्रिस्त गणपती मंदिरात हरिदास पालवे यांच्या संस्कृत किर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध

0

अहमदनगर :  (सुनिल नजन/अहमदनगर) शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र आव्हाने येथिल निद्रिस्त गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मुळचे घाटशिरस येथील परंतु आता आळंदी येथे गुरुकुल संस्थेत कार्यरत असलेले ह.भ.प.डॉ हरिदास महाराज पालवे शास्त्री यांच्या संस्कृत किर्तनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. डॉ पालवे यांनी किर्तनकार झाल्या नंतर थेट परदेशातील विद्यार्थ्यांना संस्कृत अभ्यास शिकवून पुन्हा मायदेशी परत आले आहेत. संस्कृत मधून काही उतारे बोलताना आपल्या श्रोत्यांच्या डोक्यात काहीच बसत नव्हते परंतु मराठीत भावार्थ सांगितल्या मुळे उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.महाराष्ट्रात संस्कृत किर्तन करणारा महाराज ग्रामीण भागात प्रथमच किर्तनासाठी आल्यामुळे मराठी किर्तनकारांची भंबेरीच उडाली. हिंदूत्वाचे अनेक दाखले देत जगात भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे हे पालवे महाराज यांनी पटवून दिले. महाराजांना आव्हाने गावात आणण्यासाठी गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मालोजीराव भुसारी, आणि विश्वस्त व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक बबनराव भुसारी यांचा सींहाचा वाटा होता. शेवगावचे वसंतराव देवधर आणि अमरापूरचे लक्ष्मणराव बोरुडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी पालवे यांचे किर्तन तर सायंकाळी ह.भ.प.गणेश महाराज डोंगरे यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते.सकाळी महाअभिषेक आणि आरतीला सर्व पुरोहित उपस्थित होते. अध्यक्ष मालोजीराव भुसारी सर,सरचिटणीस अर्जुन राव सरपते,विश्वस्त अंकुशराव कळमकर,नारायण जाधव,अशोकराव सोंडे, कारभारी तळेकर, रामदास दिवटे,सुधाकर चोथे,तात्या खैरे, शेवगाव दुधसंघाचे चेरमन आंबादास कळमकर,बापुसाहेब भुसारी, देडगावच्या बालाजी देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे,दराडे शास्त्री,दिवटे महाराजासह ग्रामस्थ आणि भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.चांगली साउंड सिष्टिम दिल्यामुळे भाउ लुणावत यांचे सर्वांनी आभार मानले.या मंदिरावर एकूणच २९ कळस बसविण्यात आले आहेत. आणि नवसाला पावणारा निद्रिस्त गणपती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त मोठ्या संखेने दर्शनासाठी येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here