राज्य : मा. ना. डॉ. भारतीताई प्रविण पवार, आरोग्य व कुटुंब कल्याण, राज्यमंत्री, भारत सरकार यांच्या यांच्या संकल्पनेतुन दि. २२ जुलै २०२३ रोजी मा.ना. देवेंद्र फडणवीस व मा. ना. अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या वाढदिवसा निमित्त तालुकास्तरीय हृदय रोग निदान व उपचार शिबीरांचे प्रधान मंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना संलग्नीकृत रुग्णालया मार्फत मोफत तपासणी करण्यात आली यात ECG ,रक्तदाब व रक्ताच्या प्राथमिक चाचण्या करण्यात आल्या या पैकी ज्या रुग्णांना हृदयाचा आजार निष्पन्न झाला त्यात नाशिक येथील नामवंत रुग्णालयात त्या रुग्णांच्या हृदयाच्या मोफत शस्रक्रिया केल्या जाणार आहेत.सदर शिबीर आयोजनासाठी सहकार्य केलेल्या जिल्ह्यातील रुग्णालय व कार्यकर्त्यांचे आभार.









