Home Breaking News रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान:- डॉ. भारती पवार

रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान:- डॉ. भारती पवार

0

पुणे :  राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिर डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. सदर रक्तदान शिबिराला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला रक्तदान शिबिराच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या रक्ताचा सर्वसामान्य व गरजू रुग्णांना लाभ होईल “रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” असे समजले जाते अन रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करावे असे आवाहन डॉ.भारती पवार यांनी यावेळी केले. तसेच डॉ. भारती पवार यांच्या हस्ते 10 वी /12 वी तसेच स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सत्कार केला व सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक अजय खेडेकर, सरचिटणीस दीपक पोटे,नगरसेवक सम्राट थोरात, आरती ताई कोंडरे ,मनीष जाधव ,विजयालक्ष्मी हरिहर,प्रतिभाताई ढमाले, प्रमोद कोंढरे, जितेंद्र कोळेकर, राजेंद्र काकडे, छगन बुलाखे, रेश्मा सय्यद,अश्विनी पांडे, राणीताई कांबळे, योगिता गोगावले, अमित कंक,आशाताई शिंदे, किरण जगदाळे, अभिता राजपूत, अमित गोखले,मुकेश पायगुडे, परेश मेंदळे, योगेश थोरात व आदी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here