Home Breaking News मनपा शाळा क्र.७१ मध्ये जागतिक योगदिन उत्साहात संपन्न

मनपा शाळा क्र.७१ मध्ये जागतिक योगदिन उत्साहात संपन्न

0

नाशिक : 🧎‍♀️🧎‍♂️🧎‍♀️🧎‍♂️🧎‍♀️🧎‍♂️🧎‍♀️🧎‍♂️🧎‍♀️
सिडकोच्या हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ मध्ये जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक योगदिनाचे औचित्य साधून गेल्या चार दिवसांपासून शाळेत योगदिनाची पूर्वतयारी चालू होती. महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या योगशिक्षिका जयश्री भामरे, योग विद्याधाम नाशिकच्या सुनंदा सखदेव व त्यांचे सहकारी योगशिक्षक यांनी शाळेत येऊन सर्व विद्यार्थ्यांकडून योगासनांचा दररोज सराव करुन घेतला. आज जागतिक योगदिनी प्रार्थना, दंडस्थिती, बैठक स्थिती, शयनस्थिती, विपरीत शयनस्थिती, कपालभाती, प्राणायाम, ध्यानधारणा व प्रार्थना अशाप्रकारे विद्यार्थ्यांकडून योगासनांचा अभ्यास करुन घेण्यात आला. इ. १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली किसन काळे, विनोद मेणे, प्रमिला देवरे, शोभा मगर, कविता वडघुले, रुपाली ठोक, योगिता खैरे, वर्षा सुंठवाल, किर्तीमाला भोळे, सुवर्णा थोरात, शैलजा भागवत, प्रविण गायकवाड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here