मनमाड : मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आज रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग दिनाचे निमित्ताने मनमाड शहर पोलीस स्टेशन येथे सकाळी 07-00 ते 07-45 वाजेपर्यंत योगा प्रात्यक्षिक घेण्यात आले.कार्यक्रमासाठी पोनि श्री बाळासाहेब थोरात, पोउपनी श्री गणेश जांभळे, पोउपनि सरोवर यांचे सह पोलीस स्टेशन कडील व आरसीपी मनमाड करील एकूण 43 अंमलदार उपस्थित होते. प्रात्यक्षिकांमध्ये योगा प्रकाराचे शवासन, शीर्षसन असे विविध प्रकार घेण्यात आले.









