Home Breaking News पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली सबका साथ, सबका विकास मंत्राने संपूर्ण देशाचा विश्वास...

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली सबका साथ, सबका विकास मंत्राने संपूर्ण देशाचा विश्वास संपादन केला आहे :-डॉ. भारती पवार

0

पिंपळगाव : पिंपळगाव बसवंत येथे भाजपतर्फे आयोजित महाजनसंपर्क अभियान अंतर्गत बुद्धिजीवी लोकांचे संमेलन पार पडले. केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबवून त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवत आहे. देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे. या विकासात वकील, डॉक्टर, व्यावसायिकांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे या घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले.भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय म्हणाले, यापुर्वीचे पंतप्रधान अबोल होते. त्यांचे निर्णय देखील अन्य लोक घेत होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाचा सन्मान वाढला आहे. भाजपने मतांसाठी कधीच राजकारण केले नाही. देशात विकासाची गंगा सुरू असल्याने मोदींचा करिष्मा कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी गोवा खासदार विनय तेंडुलकर, माजी मंत्री जयकुमार रावल,जिल्हाध्यक्ष केदा आहेर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन दराडे, तालुकाध्यक्ष भागवत बोरस्ते, यतीन कदम, जिल्हा चिटणीस सतीश मोरे, किसान मोर्चाचे बापूसाहेब पाटील, अल्पेश पारख, रवींद्र मोरे, शंकर वाघ, सारिका डेर्ले, परेश शहा, शहर वकील संघाचे अध्यक्ष रणजित चव्हाण, प्रशांत घोडके, संदीप झुपे, वैभव पुस्तके, जीवन निफाडे, रंजीत चव्हाण,प्रकाश पगारिया,ज्योती निरगुडे, शिवाजीबाबा बस्ते,रवींद्र सोनवणे, अरुण गचाले, मानसी गचाले, संजय गाजरे,शैलाताई मोरे, अंजूताई चव्हाण, प्रतिभा मोरे,रवींद्र मोरे, सुनील मोरे, अल्पेश पारख, पवन जाधव,योगेश चौधरी, राजेंद्र सोनवणे,शिरीष कोटकर, गोविंद कुशारे,विष्णू डोमसे सह वकील, डॉक्टर,शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here