पाथर्डीचे तहसीलदार अडकले लग्नाच्या बेडीत

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
दुष्काळी पाथर्डी तालुक्याच्या डोंगराळ भागात उत्कृष्ट तहसीलदार म्हणून सेवा उपलब्ध करुन देण्यात तरबेज असलेले पाथर्डीचे तहसीलदार शाम वाडकर हे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. वांबोरी येथील सौ.चंद्रकला व श्री बाळासाहेब शंकर वाडकर यांचे सुपुत्र तहसीलदार शाम आणि राहुरी येथील सौ.संजिवनी व श्री सुरेश धोंडिराम तनपुरे यांची कन्या चि.सौ.कां. ऋचा यांचा शुभविवाह राहुरी येथील स्टेशन रोडवरील वरील व्यंकटेश मंगल कार्यालयात मोठ्या थाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यासाठी, शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे, पाथर्डी पंचायत समितीचे माजी उपसभापती विष्णू पंत अकोलकर, भारत मतकर, तिसगावातील सोन्याचे प्रसिद्ध व्यापारी बेंद्रेसराफ,पाथर्डीच्या तहसील कार्यालयातील मुख्य कर्मचारी सदानंद बारसे यांच्या नेतृत्वाखालील सर्व तहसील कर्मचारी आणि संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील धार्मिक, सामाजिक,शैक्षणिक, राजकीय,क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here