“एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीत भविष्यातील औषध संशोधन आणि नवकल्पना: प्रबंध लेखन स्पर्धेचा आयोजन “

0

नाशिक : २७ सप्टेंबर २०२४ रोजी एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी मध्ये जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त अकॅडेमिक डेसिफायर-मुंबई द्वारे प्रायोजित प्रबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेत मुख्य अतिथी म्हणून डॉ. डी. एम. भामरे, माजी सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र सरकार आणि श्री. जे. एस. गिल्डा, माजी कार्यकारी संचालक, ब्लू क्रॉस लॅबोरेटरी, नाशिक उपस्थित होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अनेक लेख सादर केले, ज्यामध्ये फार्मासिस्टच्या भूमिकेवर, औषधांच्या वापरावर आणि आरोग्यसेवांवरील त्यांच्या योगदानावर लक्ष केंद्रित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या विचारप्रवृत्तीतून फार्मसी क्षेत्रातील नवकल्पना आणि आव्हानांचा उल्लेख झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. भामरे यांनी भविष्यातील संधी बद्दल मार्गदर्शन केले. व श्री. गिल्डा यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले आणि औषधनिर्मात्यांना गुणवत्तावाढ होण्यासाठीच्या काळजीविषयी मार्गदर्शन केले. फार्मासिस्टच्या महत्वाबद्दल विचारांचे महत्त्व पटवून दिले. स्पर्धेत उत्कृष्ट प्रबंध लेखन प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली, या स्पर्धेत प्रथम पारितोषिक व रोख रक्कम रुपये ५०००/- हे एस. एन. जे. बी. चे एस. एस. डी. जे. कॉलेज ऑफ फार्मसी, चांदवड येथील कुमारी रोहिणी कांतिलाल पाटील आणि गट यांना डॉ. कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले तर द्वितीय पारितोषिक रुपये ३०००/- हे एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी येथील गणेश पाटील, आदिती आहेरराव आणि गट यांना डॉ. अमर झाल्टे आणि प्राध्यापक पल्लवी उगले यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक व रोख रक्कम रुपये १०००/- हे आर. जी. सपकाळ इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी येथील मयूर चव्हाण आणि गट यांना सौ. पूनम कासार यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले तसेच द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक व रोख रक्कम रुपये १०००/- हे एम. व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी येथील आर्या थोरात हिला सौ. प्रतीक्षा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले आणि तृतीय उत्तेजनार्थ पारितोषिक व रोख रक्कम रुपये १०००/- हे वाल्मिक नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, कन्नड येथील श्वेता राजपूत आणि गट यांना सबाफरीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले.ज्यामुळे त्यांची मेहनत आणि सृजनशीलता ओळखली गेली.या स्पर्धेने विद्यार्थ्यांना विचारांचे आदानप्रदान करण्याची आणि फार्मासिस्ट म्हणून त्यांच्या भविष्याची दिशा ठरविण्याची एक अद्भुत संधी दिली. प्रा. डॉ. अमर झाल्टे व प्रा. डॉ.मनिषा तायडे यानी या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केले.व सर्व प्राध्यापकांनी सहभाग घेतला.यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.नरेंद्रभाई ठक्कर, सचिव मा. श्री. देवेंद्रभाई पटेल, फार्मसी विभागाचे सचिव मा. श्री. उपेंद्रभाई दिनानी, मा. श्री. राजेशभाई ठक्कर व प्राचार्य. डॉ. विशाल गुलेचा यांनी शुभेच्छा दिल्या.भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here