गोदावरी खोऱ्यात आता नवीन बंधारे घेता येणार नाही – आ. राजळे

0

(सुनिल नजन/अहमदनगर) न्यायालयाच्या आदेशानुसार गोदावरीच्या खोऱ्यात आता नवीन बंधारे घेता येणार नाही अशी माहिती शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली. त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे गावात धनगर समाजाच्या बाबीरदेव मंदिरासमोर दहा लाख रुपयाच्या सभामंडपाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे नुतन संचालक कुशिनाथ बर्डे हे होते. कोपरे गावात आमदार महोदयांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. नवीन तुळजाभवानी मंदिरात अहिल्यादेवी महिला बचत गटाच्या वतीने अध्यक्षा सौ.सुनिता घुले, उपाध्यक्ष कमल कुसाळकर,जेष्ठ सदस्या सौ. पद्माबाई आव्हाड, सौ. सत्यभामा उघडे, सौ.संगिता वाघमोडे यांनी आमदार राजळेंचा सन्मान केला. व नवीन मंदिरासमोर सभामंडपाची मागणी केली. ती मागणी रास्तच असल्याचे आमदार राजळे यांनी आपल्या भाषणात सांगितले. बाबीरदेव मंदिरा समोरील सभामंडपाचे काम कोंडीराम वाघ यांच्या सातवड येथील मजूर संस्थेस देण्यात आले आहे. आमदार राजळेंच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात मीरी जिल्हा परिषद गटातून झाली होती. त्या सर्व जुन्या आठवणी आमदार राजळेंनी ताज्या केल्या.यावेळी तिसगाव नळपाणी पुरवठा योजनेचे मा.अध्यक्ष एकनाथ आटकर,हनुमान टाकळी सोसायटीचे नुतन चेरमन सुभाष राव बर्डे, व्हाइस चेरमन भाउसाहेब उघडे,जवखेडे सोसायटीचे नुतन संचालक सचिन नेहुल,माजी सरपंच चारुदत्त वाघ,जि.प.सदस्य राहुल राजळे,ग्रामपंचायत सदस्य सुभाष आव्हाड, मंखळ पांढरे यांनी आपले विचार व्यक्त केले. सुत्रसंचालन अँडव्होकेट वैभव आंधळे यांनी तर आभार सोनू आव्हान यांनी मानले. याप्रसंगी कोपरे गावचे उपसरपंच नारायण वाघमोडे,सदस्य शंकरराव उघडे,दिपक धनवटे, आदिनाथ पांढरे,शिवनाथ आव्हाड गुरूजी,संदिप सुराशे,पोपट वाघमोडे, लहाणू उघडे,पोपट उघडे,सदाशिव वाघमोडे, अशोक आव्हाड, माने पाटील, अण्णासाहेब उघडे,निलेश काजळे,शिवाजी उघडे,नानासाहेब माने,तुकाराम आव्हाड ई.मांन्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here