कोपऱ्यात अखंड हरिनाम सप्ताह

0

(सुनिल नजन/अहमदनगर) नगर जिल्ह्यातील शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या सिमेवर असलेल्या कोपऱ्यात अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प.सोपान महाराज ढाकणे आणि ह.भ.प.भाउसाहेब महाराज भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ते१६ एप्रिल या काळात हा सप्ताह होणार आहे. सर्व ह.भ.प.प्रल्हाद म. आंधळे,अभिमंन्यू भालसिंग, विष्णु रणमले,बाबासाहेब मतकर, महादेव आव्हाड, ठकाजी दिंडे,यांची प्रवचणे होणार आहेत. तर सर्व ह.भ.प.हरिश्चंद्र म. दगडखैर, भाउसाहेब म.भालसिंग, सुर्यभान म. केसभट,महेश म. आव्हाड, सुरेश म. बांगर,अशोक म. कोंगे,ज्ञानेश्वर म.बटुळे यांची किर्तने होणार आहेत. दि.१५/४/२०२२ रोजी सायंकाळी दिंडी प्रदक्षिणा व ग्रंथ मिरवणूक होउन,१६/४/३०२२ रोजी सकाळी ह.भ.प. लक्ष्मण महाराज कराड यांच्या काल्याच्या किर्तनानंतर छबुराव आंधळे,पोपट वाघमोडे, प्रल्हाद नाना आव्हाड यांच्या सामुदायिक महाप्रसादाच्या पंक्तीने या सोहळ्याची सांगता होणार आहे. वरील काळात दररोज सकाळ-संध्याकाळ उघडे पाटील,ढाकणे पाटील, आव्हाड पाटील, वाघमोडे पाटील, खरात पाटील,दींडे पाटील,खेडकर पाटील परिवाराच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे.ज्ञानेश्वरी वाचन ह.भ.प. दत्तात्रय महाराज राजळे हे करणार आहोत.कोपरे ग्रामपंचायत सदस्य शंकरराव उघडे पाटील आणि संचालक नानाभाउ माने पाटील यांच्या वतीने जयमल्हार मंडप आणि,साउंड सिस्टीम या सोहळ्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दररोज काकडा भजन,किर्तन, पारायण, प्रवचन, गायन,हरिपाठ, ईत्यादी कार्यक्रम होणार आहेत तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोपरे ग्रामस्थ आणि भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here