नवरी मिळे ना नवऱ्याला’ पस्तीशी ओलांडली तरी अनेक युवक अविवाहितचं.

0

नाशिक : नाशिक प्रतिनिधी प्रशांत गिरासे
मो.9130040024

‘शेतकरी’ कुटुंबात जन्माला येऊन आम्ही गुन्हा केलाय काय? असा प्रश्‍न शेतकरी मुलांसमोर उभा ठाकला आहे. अनेकांची करोडोंची प्रॉपर्टी असून सुद्धा फक्त शेती करतो म्हणून वयाची पस्तीशी ओलांडून सुद्धा अविवाहित असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. म्हणायला फक्त शेतकरी साऱ्या जगाचा पोशिंदा आहे, मग शेतकऱ्यांच्या मुलांवरच का असा प्रसंग, का त्यांच्यासाठी कुणी घेईना पुढाकार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुलाला सरकारी नोकरी हवी, पॕकेज भरपूर हवे, मुलगा शहरात असावा, एकत्रित कुटुंब नको, शिवाय सासु-सासरेही जवळ नकोत , शहरात नोकरी पाहिजे, शिवाय गावावर शेतजमीनही पाहिजे, शेती असली तरी शेतात काम करणार नाही, अशा एक ना अनेक समस्या घेऊन बसलेल्या मुली अन् मुलींच्या पालकांनमुळे अनेक मुलांची लग्ने जुळत नसल्याचे धक्कादायक चित्र समाजात बघावयास मिळत आहे.
आलिशान बंगले, बंगल्यात सर्व सुखसोयी, आलिशान गाड्या १५/२० एकर बागायती जमीन असुनही, फक्त पंधरा हजार पगार का होईना अशी नोकरी असलेल्या मुलांना पुणे, मुंबईत राहणाऱ्या मुलांना वधु पक्षाकडून पसंती दिली जात असल्याने शेतकरी मुलांना मुलगी मिळेनासी झाली आहे.फक्त आपली मुलगी सावलीत रहायला पाहिजे मग पगार १५ हजार का होईना, शहरात भाड्याच्या घरात का राहन् होईना पण शेतात राबायची गरजच् नको असे मत मुली सोबतच तिच्या आई-वडिलांचे आहे. त्याउलट कष्ट करून शेतीत पिकविलेल्या पिकास निसर्गाने व बाजार भावाने सात दिली तर २ एकरावालाही शेतकऱ्यांची ३ ते ४ महिन्यांच्या एकाच पिकाची कमाई ही नोकरदारांच्या वर्षे भराच्या पगाराहुन जास्त असते. शिवाय दोनचं मजुर जरी रेगुलर ३ महिन्याभर कामास लावले तरी (४५ ते ५० हजार) नोकरदार मुलाच्या तीन महिन्यांच्या पगाराईतकी मजुरी ही शेतकरी वाटत् असतो. म्हणजेच थोडक्यात जेवढा पगार नोकरी करुन मुलगा कमवतो त्याच्या दुपटीने शेतकरी मुलगा आपली कमाई बाजूला सारून मजुरांना पोसतो.अनेक शेतकऱ्यांची मुले सैनिक, इंजिनिअर, व्यवसाहिक, किंवा अनेक कंपन्यांमध्ये छोट्या-मोठ्या पदावर कार्यरत आहेत शिवाय त्यांना अतिशय भरगच्च पगारही आहे पण शेती कमी प्रमाणात आहे किंवा दोन भावंडे आहेत अशा मुलांनाही लग्नास असंख्य अडचणी आहेत. कारण नोकरदार जावाई हवाच हवा त्याचबरोबर एकटा हवा, व शेती भरपूर हवी. पण वेळ प्रसंग पडला तरी मुलगी शेतीत राबणारचं नाही याबाबत मुली व मुलीचे पालक ठाम असल्याने अनेक विवाह जुळुन सुद्धा मोडले असल्याचे चित्र समाजात बघावयास मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here