पत्रकारांच्या सहकार्याच्या भुमिकेमुळे मी मतदारसंघाच्या शेवटच्या टोकाला पोहोचले – आमदार राजळे

0

पत्रकारांच्या सहकार्याच्या भुमिकेमुळे मी मतदारसंघाच्या शेवटच्या टोकाला पोहोचले ः आमदार राजळे (सुनिल नजन/ अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील पत्रकारांच्या सहकार्याच्या भुमिकेमुळे मी मतदार संघात विकासकामा साठी शेवटच्या टोकाला पोहोचले असे उदगार शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांनी काढले त्या शेवगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकार सन्मान सोहळ्या प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलत होत्या.त्यांच्या समवेत भाजपचे शेवगाव तालुका अध्यक्ष ताराचंद लोंढे,माजी अध्यक्ष बापुसाहेब पाटेकर,जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे हे उपस्थितहोते. प्रारंभी जनार्दन वांढेकर यांनी प्रास्ताविक केले. शेवगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष कैलास बुधवंत,पाथर्डी तालुका प्रेसक्लबचे अध्यक्ष उमेश मोरगावकर,निळकंड कराड,अविनाश मंत्री, रेवननाथ नजन यांनी पत्रकारीता काल,आज,आणि उद्या म्हणजे कालच्या काळात कशी होती,आज कशी आहे आणि उद्याच्या येणाऱ्या काळात कशी असेल याचे सविस्तर मार्गदर्शन केले.आमदार मोनिकाताई राजळे यांनी संपूर्ण मतदार संघातील विकास कामाचा आढावा घेऊन आगामी काळात होणाऱ्या निवडनुकीत पत्रकारांची भुमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगितले.शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील पत्रकारांना भगवे फेटे बांधून पेन डायऱ्या देउन एकप्रकारे आगामी नगरपालिका,जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या निवडनुकीचे रणशिंग फुंकल्याची चर्चा संपूर्ण मतदार संघात सुरू झाली आहे.पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पत्रकारांना आमंत्रित करून सहभोजन देउन एकप्रकारे विरोधकांना “हम किसीसे कम नही”चा ईशारा दिला आहे.सुत्रसंचालन सुरेश बाबर यांनी तर आभार अर्जुन नेहुल यांनी मानले.यावेळी नामांकित पत्रकारापैकी शेवगाव तालुक्यातील जगन्नाथ गोसावी, शंकर मरकड,सुनिल नजन, निजाम पटेल, रावसाहेब निकाळजे,दिपक खोसे,शाम पुरोहित, रावसाहेब मरकड, नवनाथ फासाटे,रामनाम रुईकर, सचिन सातपुते, बाळासाहेब खेडकर, जनार्दन लांडे, जयप्रकाश बागडे,सुभाष बुधवंत,पाथर्डीतील पत्रकार सचिन नंनवरे, अजय गांधी, सोमनाथ बोरुडे, अमोल कांकरिया, राजेंद्र सावंत, दशरथ नरोटे, बाबासाहेब गर्जे, नितीन गटानी, शिवदास मरकड,राजु शिंदे, क्रुष्णा अंदुरे,शेवाळे यांच्या सह दोन्ही तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here