डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय यशवंत गौरव पुरस्काराणे सन्मानित

0

नाशिक 🙁  प्रशांत गिरासे वासोळ,मो.9130040024 )
बागलाण तालुक्याचे आराध्य दैवत, देवमामलेदार यशवंत महाराज रथ उत्सव शताब्दी निमित्त शिवशंभू संघटना नाशिक जिल्हा यांच्या वतीने यशवंत गौरव पुरस्काराणे गेल्या वीस वर्षांपासून,सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक कार्यक्रम आयोजित करणाऱ्या तसेच लोकप्रतिनिधी,शासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून समाजपयोगी उपक्रम राबविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय सटाणा यांना सन्मानित करण्यात आले.मा. आमदार संजय चव्हाण,नगराध्यक्ष सुनील मोरे,मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार शेवाळे,भालचंद्र बागड,सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते पोपटराव बच्छाव, वाचनालयाचे अध्यक्ष किरण बच्छाव यांनी पुरस्कार स्वीकारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here