चांदवड तालुका मराठी पत्रकार संघाची सन निवडणूक बिनविरोध.

0

नाशिक : प्रशांत गिरासे नाशिक
मो -9130040024) चांदवड दि.२२-
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्नित चांदवड तालुकाध्यक्ष मराठी पत्रकार संघाची सन २०२२~२४ या वर्षांची द्विवार्षिक निवडणूक नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार व जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे यांचे मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली.चांदवड तालुका मराठी पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांचे प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह चांदवड येथे आज (दि.२२) पार पडली.जिल्हा पदाधिकारी यशवंत पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.एकूण १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत.त्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली.नविन कार्यकारिणी अशी.तालुकाध्यक्ष विजय काळे,कार्याध्यक्ष हर्षल गांगुर्डे,उपाध्यक्ष पोपटराव सोनवणे व धनंजय पाटील,सरचिटणीस भरत मेचकुल,सहसरचिटणीस अनिल पवार ,खजिनदार कु.श्रद्धा केशवराव कोतवाल,सहखजिनदार अनिल राऊत,संघटक कैलास सोनवणे,सहसंघटक अरविंद आहेर,समन्वयक भाऊसाहेब अहिरे,कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत भंडारे,विक्रम देवरे, देवीदास जाधव,सुनील आर.काळे,स्वीकृत सदस्य बाळासाहेब बच्छाव,नितीन फंगाळ,राजेंद्र बारगळ व सचिन हिरे.नवनिर्वाचित पदाधिकारींचा संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विजय काळे,कैलास सोनवणे,बाळासाहेब बच्छाव,भरत मेचकुल यांनी मनोगत व्यक्त केले.महेंद गुजराथी यांनी आभार मानले.निवडणूकी प्रसंगी तालुका पत्रकार संघाचे सर्व सभासद उपस्थिती होते.नवनिर्वाचित पदाधिकारींचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here