सावखेडा खु.ते शेळके वस्ती रस्ता बनला चिखलमय शेतकऱ्याचे अतोनात हाल संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष विजय पवार यांनी दिले तहसीलदार यांना निवेदन

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे : जिल्हाभरात कोटयवधी रुपये रसत्यांच्या कामासाठी खर्च होत आहे तर दूसरीकडे सिल्लोड तालुक्यातील सावखेडा ते शेळके वस्ती सुमारे 4 किलोमीटर रस्ता पूर्ण चिखलमय झालाय दरवर्षी पावसाळा सुरू होताच या रसत्याने शेतकऱ्यांना शेताकडे जान्यासाठी चिखलातून चिखल तुडवत मार्ग काढावा लागत आहे. रसत्यात चिखल साचल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या रसत्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे.माघील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे शेताकडे जाणारे रस्ते मोठ्या प्रमाणात चिखलमय झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चिखलातून वाट शोधावी लागत आहे. दुसरीकडे शेतीसाठी लागणारे साहित्य, खते, साहित्य बैलगाडीत घेऊन जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.पावसाच्या पाण्याने रस्ता पूर्ण चिखलमय होत असल्याने एक किलोमीटर लांब गाडी पार्क करून नागरिकांना पायदळ घरापर्यंत जावे लागते. पावसाळ्यात या मार्गावर अधिकच त्रास होत असल्याचे विजय पवार यांना बोलताना सांगितले आहे परीसरात झालेल्या अतिवूटीमुळे मुख्य रस्त्सत्या पाठोपाठ पाणंद रस्त्यांची अत्यंत भिकट झाली आहे सावखेडा ते शेळके वस्ती हा 4 कि.मी.रस्ता चिखलमय झाला असून रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याने नागरीकांना चिखल तूडवत वाट काढावी लागत आहेसंभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष विजय पवार यांनी नायब तहसीलदार गवळी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात माजी सं.ब्रि.ता.आध्यक्ष संदिप बावस्कर,व शेतकरी. कूण्णा शेळके,आजीनाथ शेळके,सुरेश शेळके,विशाल भोजने,एकनाथ भोजने,गणेश शेळके,पांडूरग शेळके,संजय शेळके,सुदाम शेळके,आदित्य शेळके,सचिन शेळके,भगवान शेळके,गणेश शेळके,ज्ञानेश्वर शेळके,त्रिंबक भोजने,अशोक गोरे,कूण्णा भोजने,शाऊबा शेळके,प्रभु भोजने,गिरधर भोजने या ग्रामस्थाच्या सह्या निवेदनात आहे.सावखेडा खु ते शेळके वस्ती या रस्त्याची मी पाहणी केली आहे या शेतकर्‍यांची,विद्यार्थाची खुप दयनीय अवस्था झाली आहे संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्यांना चिखलातून वाट शोधावी लागत आहे.विजय पवार संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष सिल्लोड,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here