
मनमाड: ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन कारखाना शाखा च्या कार्यालयात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सुभाष जगताप, बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप उपस्थित होते.झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात धम्मचक्र प्रवर्तन दिन चे महत्व विशद केले.भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून ते आजपर्यंत बौद्ध धर्माचे महत्त्व विशद केले.यावेळी विनोद खरे,सागर साळवे, अर्जुन बागुल आदी चे भाषणे झाली.कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप पगारे, कारखाना शाखा च्या कार्यकारिणी सदस्य अनिल अहिरे, फकिरा सोनवणे, राहुल शिंदे, नितीन केदारे, दिपक अस्वले आदी ने केले.
