पूरग्रस्त भागात रिपोर्टिंग केलेल्या पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी आणि TT धनुर्वात इंजेक्शन, प्रथमोपचार औषध किट-मास्क-हॅन्ड सॅनिटीझरचे वाटप

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप -९७६८४२५७५७,सांगली:* पूरग्रस्त भागात जीव धोक्यात घालून रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी सांगलीत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. सांगली काँग्रेसचे नेते विशाल पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शिवसेनेचे सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री.नानासाहेब शिंदे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी आरोग्य शिबिराचे उदघाटन केले.डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशन, आरोग्य राज्यमंत्री श्री राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फौंडेशन तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, सेवासदन लाईफ लाईन, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटना आणि वृत्तवाहिनी पत्रकार संघटना यांच्या संयुक्तपणे हा उपक्रम राबवण्यात आला आहे.शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि खा.डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.डॉ.जे. बी. भोर ( सर ) ठाणे यांच्या नेतृत्वाखालील डॉ. आशिष बचे, डॉ. विनोद वाकडे, डॉ. मुर्सळ सर यांचे वैद्यकीय सेवासदन मधील डॉ. सिमरन मुजावर, डॉ. प्रथमेश इंगळे आणि विद्या पवार यांच्या पथकाने पत्रकारांची आरोग्य तपासणी केली.यात प्रामुख्याने पूरग्रस्त भागात रिपोर्टिंग केलेल्या पत्रकार बांधवाना TT धनुर्वात इंजेक्शन देण्यात आले.लेप्टोस्पायरोसिसचा धोका उदभवू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून Doxycycline औषधे वाटप करण्यात आली. रक्तदाब किंवा मधुमेह असणाऱ्या पत्रकार बांधवाना Amdipine आणि Glycomate/Metmorphin औषधे वाटप करण्यात आली. रक्ताची तपासणी ( मधुमेह ) आणि ECG तपासणी करण्यात आली.सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या “पत्रकार भवन”मध्ये हे आरोग्य शिबीर घेण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य संघटक संजय भोकरे, माजी राज्यध्यक्ष गणेश जोशी, संपादक हणमंत मोहिते, सुभाष खराडे, प्रकाश कांबळे वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र कांबळे, दैनिक लोकसत्ता चे दिंगंबर शिंदे उपस्थित होते. यावेळी विविध दैनिकांच्या आणि वृत्तवाहिनीच्या पत्रकारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन टीम कक्ष प्रमुख श्री. मंगेश चिवटे आणि शिवसेनेचे सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री.नानासाहेब शिंदे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यांनी या आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here