नाशिक विमानतळास पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नांव देण्यात यावे

0

येवला:- पद्मश्री कर्मवीर खा. दादासाहेब गायकवाड यांचे ओझर (मिग) विमानतळ नाशिक येथे मंजूर करून आणण्यासाठी खूप मोठे योगदान आहे .सन 1957 पासून भारत रशिया या दोन देशातील करारा नुसार भारतात बंगलोर येथे एच ए एल मिग विमानाचा कारखाना जाणार होता.तो नाशिक येथे सुरू करावा अशी मागणी दादासाहेब गायकवाड यांनी तत्कालीन सरंक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे केली असता दादासाहेब गायकवाड यांच्या मागणीची दाखल घेत यशवंतराव यांनी तत्काळ मंजुरी देऊन ओझर येथे मिग विमानाचा कारखाना उभारण्यात आला .त्यांच्या प्रयत्नातुन सदरच्या विमानतळ निर्माण झाले आहे.आंतरराष्ट्रीय विमान सेवेची सुरुवात ही ओझर येथून होत असल्याने सदरच्या विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नांव देण्यात यावे
अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचा वतीने उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांना देण्यात आले.यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाउपाध्यक्ष रेखाताई साबळे, महिला शहराध्यक्ष संगिता साबळे,रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष दिपक लाठे, वंचितचे संदिप जोंधळे, भाऊसाहेब आहीरे, दत्तू वाघ,संजय पगारे,भानुदास पठारे,शशिकांत जगताप,वसंत घोडेराव, दयानंद जाधव,हरिभाऊ अहिरे,आनंद शिंदे,विठ्ठल जाधव, ,आदी सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here