नाशिक कळवण रोड राज्य महामार्ग अक्राळे फाटा ते लखमापुर फाटया पर्यत अपघात प्रवण क्षेत्रात रस्ते सुरक्षा उपाययोजना त्वरित करा :खा. डॉ भारती पवार

0

नाशिक : नाशिक कळवण रोड राज्य महामार्ग अक्राळे फाटा ते लखमापुर फाटया पर्यत अपघात प्रवण क्षेत्रात रस्ते सुरक्षा उपाययोजना त्वरित करा :खा. डॉ भारती पवार ,सध्या पावसाळयाचे दिवस सुरु झालेले आहेत. नाशिक कळवण रोड राज्य महामार्ग अक्राळे फाटा ते लखमापुर फाटया पर्यंत गेल्या काही दिवसात अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. वाढलेल्या अपघातांच्या प्रमाणाची आपल्या स्तरावरुन कारणमिमांसा करण्यात यावी. व त्याअनुषंगाने सदर रस्त्यास आवश्यक ती उपाययोजना तातडीने करण्यात यावी तसेच पावसाळा सुरू होत असून जिल्ह्यातील अनेक रस्ते हे खराब अवस्थेत असून त्यामुळे अपघात होऊ शकतात त्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती त्वरित हाती घेण्यात यावी व ज्या ठिकाणी अपघात क्षेत्र आहे त्याठिकाणी फलक लावण्यात यावे तसेच कळवण शहरातील रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे जेणेकरून अपूर्णावस्थेतील कामामुळे कळवण मधील त्रस्त झालेल्या व्यापारी वर्गाचा त्रास कमी होण्यास मदत होईल .अशी मागणी खा भारती पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शरद राजभोज यांचेकडे केली. या प्रसंगी उप अभियंता यशवंत पाटील, कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्र,संजय पाटकर, विलास बिरारी,आर श्रीनिवास यांचेसह दिंडोरी भाजप तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव कळवण भाजपा तालुकाध्यक्ष दिपकजी खैरनार , भाजपा जेष्ठ नेते गोविंद कोठावदे, सुधाकर पगार, निंबाजी पगार दिंडोरी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमर राजे ,संदीप बोरस्ते, नितीन देशमुख, शिवाजी पिंगळे ,आदी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here