वासोळ : प्रतिनिधी प्रशांत गिरासे,मो. ९१३००४००२४
लोहोणेर येथील सफाई कामगार कांतीलाल सोलंकी, त्यांच्या पत्नी वर्षा सोलंकी यांचा सत्कार करण्यात आला.संकल्प फाउंडेशन कडून लोहोणेर येथील सफाई कामगार हे कोरोना काळात आपल्या जिवाची परवा नकरता गांवाची साफसफाई करत आहेत.
लोहोणेर येथील विलिनीकरण कक्षात ही सोलंकी दाम्पत्य स्वच्छता करत आहेत म्हणून संकल्प फाऊंडेशन कडून सत्कार करत आर्थिक मदत हि करण्यात आली आहे.यावेळी संकल्प फाउंडेशन चे सदस्य तसेच योगेश पवार, दिलिप आहिरे, अन्सार मन्सुरी, निंबा जगताप, अमोल सोनवणे, सोमनाथ जगताप, सुभाष परदेशी आदी उपस्थित होते