सेवानिवृत्ती एका ‘जनसेवकाची

0

मनमाड : सर्वगुणसंपन्न , हसतमुख आणि सदैव जनसेवेच्या कार्यासाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच महाराष्ट्र बँकेतुन हेड कॅशियर म्हणुन सेवानिवृत्त झालेले श्री प्रमोद नरहर मुळे,श्री मुळे महाराष्ट्र बँकेत आपल्या आयुष्यातील 39 वर्षे सेवा करून काल 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. बँकेचे कर्मचारी म्हंटले कि लोकांना त्यांचा फारसा काही चांगला अनुभव येत नसतो ,परंतु याला देखील काही माणसे अपवाद असतात.अशाच माणसांमधले एक म्हणजे आपले मुळे बँकेतील त्यांच्या सेवा काळात अनेक लोकांना आणि ग्राहकांना नेहेमी मदतच केली आहे.महाराष्ट्र बँक म्हंटली की तेथे गर्दी ही नेहेमीचीच , येथे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांचे पेन्शन असल्याने बँकेत नेहेमीच ग्राहकांची वर्दळ असते. या मुळे श्री मुळे अनेक ग्राहकांशी संपर्क होत असल्याने त्यांचे लोकांशी संबंध देखील अत्यंत जिव्हाळ्याचे, अनेक जेष्ठ नागरिकांना मदत केली आहे.अनेक असे ही बँकेचे ग्राहक होते कि जे अपंग , जेष्ठ की ज्यांना बँकेत येण्यास त्रास होत असे , अशा ग्राहकांचा घरी जाऊन देखील त्यांना सेवा दिलेली आहे. कोणाला बँकेच्या कामा संबंधित काही अडचण आल्यास किंवा अनेक तरुणांना व्यवसायीक लोन घेताना काही तांत्रिक अडचण आल्यास  यांचे शंकेचे निरसन करून योग्य मार्गदर्शन देखील केले आहे.श्री मुळे नी आपल्या सेवा काळात कधीही अनपेक्षित रजा घेतली नसुन ते नेहेमी कामावर हजर असायचे. सध्याच्या सुरू असणाऱ्या कोरोना परिस्थितीत देखील त्यांनी रजा शिल्लक असुन देखील रजा न घेता एक कोरोनायोध्या बनुन आपली जबाबदारी पार पडली आहे.श्री मुळे यांचे कार्य हे फक्त बँके पुरतेच मर्यादित नसुन श्री प्रमोद मूळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून देशसेवेचे कार्य देखील बालपणापासून करत आहे. त्यांच्या याच कार्याची पावती म्हणुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख श्री मोहनजी भागवत हे देखील श्री मुळे याच्या घरी येऊन गेले आहे.मनमाड येथील अनेक नागरिकांच्या घरी साप्ताहिक विवेक चे विचार पोहचवण्यामागे श्री मुळे  खुप मेहनत असते.वनवासी कल्याण आश्रम , जनकल्याण रक्तपेढी , संस्कृती संवर्धन समितीच्या कार्यामध्ये देखील श्री मुळे यांचा नेहेमीच पुढाकार असतो.या सर्व गोष्टींबरोबरच श्री मुळे  हे आपल्या परिवाराची आणि स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घेत असतात. काकांचे सकाळी आणि सायंकाळी नेहेमी पायी फिरणे असल्याने त्यांनी आपले आरोग्य उत्तम रित्या जपले आहे. आपल्या परिवारा प्रति असणारी जबाबदारी देखील उत्तम रित्या पार पडली आहे.सौ.मुळे  या उत्तम योग शिक्षिका असुन त्याचे अनेकांना प्रशिक्षण देखील देत असतात ,या कामासाठी श्री मुळे हे त्यांना देखील नेहेमी मदत करत असतात.श्री प्रमोद मुळे हे आपली बँकेत असणाऱ्या अत्यंत जबाबदारीची उत्तम सेवा करून सेवानिवृत्त जरी झाले असेल परंतु त्यांना त्यांच्या आयुष्यातील पुढील सामाजिक कार्यासाठी जास्त वेळ मिळणार आहे.श्री मुळे च्या या सेवापूर्ती निमित्ताने त्यांना उत्तम आरोग्यमय शुभेच्छा….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here