वाळू तस्कर धास्तावले

0

सिल्लोड, प्रतिनिधी: विनोद हिंगमिरे: सिल्लोड तालुक्यात बेसुमार वाळू उपसा व मोठ्या प्रमाणात दिवसापूर्वी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ग्रामीण पोलीस खडबडून जागी झाले असून शुक्रवार रोजी पहाटे कुणी नसल्याचा व अंधाराचा फायदा घेत अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी पकडले. पोलिसांनी ही कारवाई शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास तालुक्यातील शेलगाव फाटा, सिसारखेडा व के-हाळा अशा वेगवेगळ्या ठिकाणी केली. या वाळू चोरी प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलीस कारवाईत पकडण्यात आलेल्या ट्रॅक्टर मालकांची माहिती अशी चालक विनोद अशोक नेव्हारे (२५), मालक संदीप अशोक नेव्हारे (३४) दोघे रा. सिसारखेडा, चालक- मालक पुंडलिक पांडुरंग दारुंटे (३१) रा.के-हाळा, व चालक पंढरीनाथ जयाजी अंभोरे (४५) रा. चारनेर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.गुरुवारी रात्री गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी बाळू पाथ्रीकर, पगारे अवैद्य धंद्याची माहिती काढत असताना वाळूचे भरलेले ट्रॅक्टर चारनेरला जात असल्याची माहिती मिळाली. शेलगाव फाट्याजवळ पोलिस कर्मचारी दबा धरुन बसलेले असताना वाळूने भरलेले महिंद्रा कंपनीचे विना पासिंग ट्रॅक्टर मिळून आले. या दरम्यान चालक पंढरीनाथ अंभोरे ट्रॅक्टर घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.  दुसऱ्या कारवाईत परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड, पोलिस कर्मचारी प्रल्हाद जटाळे, नितीम गायकवाड गस्त घालत असताना शुक्रवारी पहाटे के-हाळा शिवारात ट्रॅक्टर (क्रं. एमएच- २०, ईवाय- ३१८४) वाळूने भरलेले मिळून आले, तर याच दरम्यान सिसारखेडा शिवारात एक लाल रंगाचा विना पासिंग ट्रॅक्टर वाळूची चोरटी वाहतूक करताना मिळून आला. एकाच दिवशी भल्या पहाटे तीन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या शिताफिने अवैद्य वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले. यात दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले, तर एक चालक ट्रॅक्टरसह पळून जाण्यात यशस्वी झाले. वाळू तस्कर धास्तावले   परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड यांच्याकडे सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचा पदभार सोपवण्यात आलेला आहे. रुजू होताच त्यांनी अवैध धंद्यावाल्यांविरोधात मोहीम हाती घेतली. यात त्यांनी वाळू तस्करांविरोधात कारवाईचा फास आवळल्याने वाळू तस्कर चांगलेच धास्तावले असून तालुक्यातील अवैद्य धंद्याना चांगलाच लगाम बसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here