वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे
Mo 9130040024,वासोळ ता.देवळा येथील आदिवासी बांधवांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन वासोळ ग्रामस्थ, प्रहार संघटना आणि भारतीय मानवाधिकार परिषद यांच्या वतीने देवळा पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा की महावितरण कंपनीच्या नावाखाली वसुलीचे कारण दाखवून वासोळ येथील आदिवासी बांधव अनिल गवळी व गोरख गवळी यांच्यावर अन्याय करून कलम ३५३ सारख्या जाचक गुन्ह्यात अडकविन्यात आले.वसूलीच्या नावाखाली महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता गांगुर्डे तसेच त्यांचे सहकारी वायरमन नितीन पवार, गोरख निकम यांनी वासोळ येथील आदिवासी कुटुंबातील गवळी यांच्या घरी जाऊन कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता किंवा नोटीस न बजावता विद्युत मीटर काढुन घेतले तसेच महावितरण कंपनीचे अभियंता आणि वायरमन येवढ्यावरच न थांबता आदिवासी बांधवाला जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच महिलांच्या अंगावर धावून जाण्यासारखे गैरकृत्य व जातीवाचक दर्जा कमी लेखून शिवीगाळ केली.आदिवासी समाजावर अन्याय होत असतांना देखील पोलीस प्रशासनाने महावितरणच्या अधिकाऱ्याची बाजू ऐकून घेत ३५३ सारख्या गुन्ह्यात गवळी कुटुंबियांना अडकविण्यात आले आहे.
गवळी कुटुंबावर अन्याय करून दडपशाहीच्या मार्गाने गुन्हे दाखल करणाऱ्या महावितरणच्या संबधित कर्मचारी यांच्यावर महिलांची घेडछाड ,जातीवाचक शिवीगाळ,तुरुंगामध्ये टाकण्याची धमक्या देणे या गंभीर स्वरूपाच्या कलमान्वये संबाधित कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच ॲट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हे दाखल न झाल्यास बुधवार दी. ३१ मार्च रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे .अशा आशयाचे निवेदन वासोळ ग्रामस्थ, प्रहार संघटना आणि भारतीय मानवाधिकार परिषद यांच्या वतीने देवळा पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांना देण्यात आले आहे,यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष कृष्णा जाधव, मानवाधिकार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष,वाल्मिक केदारे दशरथ पुरकर, विलास पवार, सोपान सोनवणे, संजय खुर्साने, भारत आहिरे, संदीप आहिरे, राहुल पगार, दिगंबर पवार,सरला गवळी, रेखा गवळी ,काळूबाई पवार, इंदूबाई खुर्साने अनिल गवळी ,ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते.
Home Breaking News महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करा; पोलीस निरीक्षकांना निवेदन