सक्तिच्या वीजबिल वसुलीबाबत शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0

वासोळ ( प्रतिनिधी प्रशांत गिरासे) शेतकऱ्यांचे लाईट बिल थकल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी कडून शेतकऱ्यांचे कनेक्शन कट केले जात आहे. वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करत आहे. खरतर अस्मानी संकट व लॉकडाऊन च्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच शेतीमाल हा कवडीमोल भावाने विकत असल्यामुळे अचानक आलेल्या वाढीव विजबिलामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. त्यातच दिंडोरी निफाड या तालुक्यामध्ये द्राक्षबागांचा हंगाम व विक्री चालू झालेली नाही. द्वाक्षबांगाचा हंगाम अंतिम टप्यात असल्याने अचानक वीज कनेक्षन कट केले तर शेवटच्या टप्यात पाणी न मिळल्याने द्वाक्षबागा अडचणीत येऊ शकता. आगोदरच अचानक आलेल्या पावसामुळे व थंडीचे कमी जास्त प्रमाण झाल्यामुळे द्राक्षबागा खराब झाल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना द्राक्षबाग विक्री होई पर्यंत वीजबिल भरण्यासाठी सवलत द्यावी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी माजी आमदार धनराज महाले, शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील पाटील, पांडुरंग गणोरे, सुरेश डोखळे, नानाभाऊ मोरे, विलास निरगुडे, रामदास वाघेरे आदी शिवसैनिक व दिंडोरी-पेठ विधानसभेतील शेतकरी वर्ग उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here