बीड- महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात घरकामगार महिला असून ते लोकांचे घरामध्ये भांडे व धूने करून आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवितात.काही महिला या विधवा आहेत, काही महिलांचे पती व्यसनाधीन असल्याने सदर महिलांना स्वतःचे घर चालविणे अवघड झाले आहे.मार्च २०२० मध्ये संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन लागले होते.सदर कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सदर महिलांचे कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत, उपाशीपोटी दिवस काढण्यास भाग पडले आहे. जर वरील स्वरूपाचे कल्याणकारी महामंडळ अस्तित्वात असते तर, घर कामगार महिला व त्यांच्या कुटुंबियावर लॉकडाऊन च्या काळात उपासमारीची वेळ आली नसती, म्हणून मा. कामगार मंत्री व महिला व बाल विकास मंत्री यांनी स्वतः जातीने व सामाजिक जाणिवेतून लक्ष देऊन सदर गरीब महिला घर कामगार यांच्या कल्याणासाठी महिला घरकाम मजूर कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे तसेच महिला घरकामगार यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बिनव्याजी शैक्षणिक कर्ज, त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी विशेष अनुदान, तसेच कुटुंबातील सदस्यांच्या विलाजासाठी विशेष तरतूद तसेच सदर घरकामगार महिलांना वृद्धपकाळासाठी पेन्शन योजना, घर कामगार महिलांना हक्काचा निवारा योजना अश्या विविध नवीन योजना अंमलात आणाव्यात जेणेकरून सदर महिलांना आयुष्य जगण्यास सोपे जाईल अशी मागणी मौलाना आझाद सेवाभावी संस्थेचे सचिव सय्यद मिनहाजोद्दिन यांनी निवेदनाद्वारे मा.कामगार मंत्री व महिला व बाल विकास मंत्री यांच्याकडे केली आहे,आपले विश्वासू,सय्यद मिनहाजोद्दिन,सचिव