बर्ड फ्लू रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अंडी- चिकन अर्धा तास शिजवून खा.

0

मुंबई -बर्ड फ्लू रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अंडी- चिकन अर्धा तास तरी 70-80 डिग्री सेल्सियस तापमानावर आधी शिजवा त्यानंतरच खा असा सल्ला राज्याचे पशु संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी राज्यातील जनतेला दिला आहे.पोल्ट्री चालकांनी, चिकन, अंडी विक्रेते यांनी कोणतेही माहिती लपवून ठेवू नये.असे आवाहनही शासनातर्फे करण्यात आले आहे.माहिती लपवून ठेवल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. कोरोना रोग जायचे नाव घेत नाही तोच महाराष्ट्र राज्यावर आता बर्ड फ्लूचे संकट ओढवले आहे. या रोगाने आता सर्वत्र हाहाकार माजविला आहे. परभणी जिल्ह्यात 800 कोंबड्यांचा बर्ड फ्लूने बळी गेल्याचे निष्पन्न होताच परभणी जिल्ह्यातील हजारो कोंबड्यांना मारून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोपट, कावळे, बगळे, साळूंके, कबुतर आदी पक्ष्यांना याची लागण होत आहे.मुंबई, ठाणे, कोकण मराठवाडा आदी भागात बर्ड फ्लूची लागण विविध पक्ष्यांना झालेली व ती मृत पावत असल्याचे निष्पन्न झाले आहे.बर्ड फ्लू हा पक्ष्यांमध्ये होणारा आजार असला तरी तो माणसांनाही होऊ शकतो.त्यामुळे काळजी घ्या.माणसांना या रोगाची लागण होणे अत्यंत दुर्मीळ आहे पण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असे पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अजित रानडे यांनी सांगितले आहे.तरी मी एक पत्रकार, लेखक, पोलिसमित्र, सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वांना नम्र विनंती करीत आहे कि सर्वांनी जागरूकता दाखवून महाराष्ट्र शासनाला सहकार्य करावे. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या परिसरात एखादे मृत पशुपक्षी आढळल्यास त्वरीत प्रशासनाला कळवावे.
धन्यवाद ,आपलाच ,विठ्ठल ममताबादे ,पत्रकार, लेखक, पोलिसमित्र ,सामाजिक कार्यकर्ता, उरण
नवी मुंबई, व्हाट्सअप नंबर -9702751098.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here