अंगणवाडीत मुलींच्या जन्माचे स्वागत

0

सिल्लोड ( प्रतिनिधी – विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथील अंगणवाडीत
किशोरवयीन मुली व नुकत्याच जन्मलेल्या
मुलीच्या जन्माचे स्वागत कार्यक्रम घेण्यात आला .
आज एकूण राज्याची स्थिती लक्षात घेता मुलांच्या तुलनेत मुलींची सरासरी घटण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. सध्यातरी मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमीच असल्याचे जाणवत आहे.गावा गावातही तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
हीच परिस्थिती अशीच राहिल्यास
किंवा वाढत गेल्यास भारतीय समाज वयवस्थेला यातून हानी पोहचू शकते.तसे होऊ नये म्हणून शासन वेगवेगळ्या माध्यमातून कठोर पावले शासनाने उचलली असून लेक वाचवा, लेक शिकवा,
सुकन्या योजना, मुलींसाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजना अशा योजना शासन राबवत असून त्याचाच एक भाग म्हणून नुकत्याच जन्मलेल्या मुलीचा व आई वडिलांचा हा स्वागत कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी अलका वाघ यांनी यांनी आपले मनोगत व्यक्त करत
पालकांनी मुलगा मुलगी असा भेद न करता दोघांना समान वागणूक दिली पाहिजे . मूला मुलीत भेद करणारे व्हिडीओ जेंव्हा व्हाट्सअप , फेसकबुक वर पाहते तेंव्हा खरच तीच परिस्थिती जर आहे तशीच टिकून राहिली तर हीन वागणुकीचा काळात रमाई, भिमाई अहिल्या कशा घडतील.असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत पुन्हा सावित्री , जिजाऊ घडवायची असेल तर मुलाबरोबर मुलीच्या जन्माचे स्वागत, समान दर्जा, समान शिक्षण ही काळाची गरज असून तीच प्रत्येकाने आचरणात आणण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
यावेळी नवजात बालकांचे माता पिता,
बालक ताई उषा शिंदे, सुनंदा देशमुख ,तारा देशमुख, ज्योती काकडे, मदतनीस कुसुम गवारे, झेलाबाई वरसाळे, सुंदरबाई गवारे
व किशोरवयीन मुली उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here