स्वाक्षरीचे जग या पुस्तकाचे प्रकाशन

0

मनमाड –  मनमाडचे भूमिपुत्र मिलिंद चिंधडे  यांनी जमविलेल्या स्वाक्षरिं वर आधारित स्वाक्षरीचे जग या पुस्तकाचे प्रकाशन घरगुती सोहळ्यात संघ स्वयंसेवक जयंत कुलकर्णी, रमाकांत तांबोळी, सुधाकर साळी, रमेश पडवळ, दीपक पाठक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मिलिंद चिंधडे हे विद्यार्थीदशेत मनमाड येथे राहात होते.ते येथील इंडियन हायस्कूलचे विद्यार्थी होते, त्यांनी आपल्या शालेय जीवनात अनेक छंद जोपासले, त्यात प्रामुख्याने काडीपेटीचे छापे गोळ करणे,  पोस्टाची तिकिटे जमविणे ह्या पासून सुरुवात करत त्यांनी स्वाक्षरी गोळा करण्याचा छंद जोपासला.   या छंदास मनमाड पासून सुरुवात करत पुढे अनेक वर्ष देशातील नामवंतांच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्या, त्यात प्रामुख्याने नानाजी देशमुख,पू भा भावे,बा भ बोरकर,निळू फुले, इ नामवंतांचा समावेश आहे.अशा स्वाक्षरी वर आधारीत ह्या पुस्तकात 123 व्यक्तींच्या स्वाक्षरी असुन त्यात व्यक्ती कार्यपरिचय करुन देण्यात आला आहे.
पुस्तकाला रमेश पडवळ ह्यांची प्रस्तावना लाभली असुन प्रकाशक प्रसाद देशपांडे हे आहेत.ह्या प्रसंगी बोलतांना मिलिंद चिंधडे म्हणाले मराठीत छंदावर आधारीत फार मोजकीच पुस्तके असुन स्वाक्षरीच्या छंदावर आधारीत आगदीच कमी पुस्तके आहेत .चिंधडे ह्याना पुस्तके जमा करण्याचा छंद आहे. ह्या प्रसंगी प्रसाद देशपांडे,सुधाकर साळी,रमाकांत तांबोळी,रमेश पडवळ आदिनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन गायत्री  चिंधडे हिने केले,ईशस्तवन रसिका चिंधडे हिने सादर केले.
मनमाडच्या भूमि पूत्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here