अवैध गुटखा पकडला

0

नाशिक – आज दिनांक ० ९ / ० ९ / २०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.के.के.पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती समजली की , सापुतारा ते नाशिक रोडने एक चॉकलेटी रंगाचे मालट्रकमधुन गुजरात राज्यातुन नाशिक शहराच्या दिशेने अवैध गुटखा येत आहे . सदर मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांनी तात्काळ प्रभारी पोलीस अधीक्षक श्री.संदिप घुगे सो .. ( अपर पोलीस अधीक्षक मालेगाव ) व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर मॅडम यांना माहिती दिली , त्यांच्या मार्गदर्शना प्रमाणे पोलीस निरीक्षक स्थागुशा यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचारी यांना सापुतारा ते नाशिक रोडवर रवाना केले . त्यांनी सापुतारा ते नाशिक रोडवर ओझरखेड परिसरात सापळा रचला , मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे एक चॉकलेटी रंगाची मालट्रक क्र.एम.एच १२ एस.एफ .४५७५ ही गाडी नाशिक बाजुकडे येतांना दिसली . सदर वाहन अडवुन वाहनावरील चालक नामे मंगेश गोरखनाथ व – हाडी , वय ४८ , रा . पिंपळगाव तर्फे नारायणगाव , ता.जुन्नर , जि.पुणे यास विचारपुस केली असता , सुरूवातीला त्याने उडवा – उडवीची उत्तरे दिली , नंतर सदर वाहन हे वणी पोलीस स्टेशनला घेवुन जावुन त्याची तपासणी केली असता त्यामध्ये काही परच्युटन माल व परच्युटन मालाच्या आतमध्ये सफेद रंगाच्या गोण्यांमध्ये आर.एम.डी. गुटख्याचे १२० मोठे बॉक्स , तसेच एम . टोबॅको मिक्स तंबाखुचे ६० मोठे बॉक्स किं.रू .४८ लाख ९ ६ हजार चा अवैध गुटखा , ०७ लाख ३२ हजार ७ ९ ० रूपयाचा परच्युटन माल , १० लाख रुपये किंमतीचे मालट्रक वाहन असा एकुण ६६ लाख २८ हजार ७ ९ ० रू . किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . सदर वाहनावरील चालकास विश्वासात घेवुन चौकशी केली असता सदर माल हा गुजरात राज्यातील पिंपळद , अहमदाबाद येथील बटको ट्रान्सपोर्ट येथुन भरलेला असुन पुणे येथे बटको टान्सपोर्टचेच ऑफिस मध्ये घेवुन जात असल्याचे सांगितले आहे . सदर बाबत वाहन चालकाविरुध्द वणी पोलीस ठाणेस भादवि कलम ३२८,२७२,२७३ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा सन २००६ चे कलम २६ ( २ ) ( iv ) , २७ ( ३ ) ( d ) ( e ) , ३० ( २ ) ( a ) , ३ ( १ ) ( ZZ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर माल हा कोणी पाठविलेला आहे तसेच कोणाला व कोठे पाठविण्यात येत होता याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे . नाशिक ग्रामीण जिल्हयाचे प्रभारी पोलीस अधीक्षक श्री.संदिप घुगे सारे . ( अपर पोलीस अधीक्षक मालेगाव ) व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर मॅडम , यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . के.के.पाटील , सहा.पोलीस निरीक्षक श्री.अनिल वाघ , सपोउनि रामभाऊ मुंढे , पोहवा दिपक आहिरे , वसंत साबळे , गणेश वराडे , प्रकाश तुपलोंढे , हनुमंत महाले , जे.के.सुर्यवंशी , संजय गोसावी , पोना प्रविण सानप , वसंत खांडवी , अमोल घुगे , पोकॉ संदिप लगड , चालक पोना काकडे , म्हसदे यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here