पोळा सणावर कोरोनाचे सावट शेतकरी वर्गाचा हिरमोड अगदी साध्या पद्धतीने सण आपापल्या घरीच साजरा करण्याचा निर्णय

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील केळगाव सह परिसरात पोळा या सणावर कोरोधाचे सावट जाणवू लागले आहे. दरवर्षीच्या पोळा हा सण व यावर्षीचा पोळा सण मोठा फरक जाणवू लागला आहे वर्षभर राबराब राबणाऱ्या या सर्जा राजाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शेतकरी आपल्या सर्जा राजा साठी घुंगर माळा गेठे झुला पायातले पैंजण अशा विविध वस्तू बनवण्यासाठी पोळा सणाच्या पंधरा दिवस आधीच शेतकरी व लहान लहान मुले आपल्या सर्जा-राजाच्या येणाऱ्या पोळा सणाच्या तयारी मध्ये असतात मात्र यावर्षी कोरोणा विषाणूने संपूर्ण महाराष्ट्र सह भारत देशात थैमान घातले असल्यामुळे पोळा या सणांवर सावट दिसून येत आहे.व अगदी हा सण आपल्याच घरी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घ्यावा लागणार असल्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये मोठी नाराजी या परिसरात निर्माण होताना दिसून येत आहे.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष सर्जेराव पवार, सोपान कोठाळे, राजु आप्पा हिंगमीरे (पञकार)
संरपच सोमनाथ कोल्हे,उपसंरपच संतोष जाधव,रामेश्वर जाधव,गोकुळ ईवरे,नामदेव मुळे,रावसाहेब कोठाळे आदीसह गावंकरी उपस्थित होते.सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील टायगर ग्रुप अध्यक्ष्य विनोद हिंगमीरे व स्वप्नील मोरे यांनी सजावट केलेला बैल दिसत आहे बैल राजाची पुजन करताना दिसत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here