
अंकाई – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ( कोवीड 19 चा संसर्ग लक्षात घेऊन सोशल डिस्टन पाळून) साजरा करण्यात आला.
विद्यालयात ध्वजारोहण सेवानिवृत्त सैनिक श्री धर्मा आहिरे, सेनादलातील श्री सचिन परदेशी, श्रीमती प्रतिभा वैद्य मॅडम यांनी संयुक्त रीतीने केले.
सदर प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अनकाई गावचे मा. सरपंच श्री डॉ सुधीर भाऊ जाधव, ग्रामपंचायत प्रशासक श्री बावीस्कर सर, श्री त्र्यंबक बडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री गणपत देवकर, श्री कासलीवाल, श्री रामकृष्ण टिटवे, श्री संतोष वैध, श्री बारकु देवकर संतोष परदेशी उपस्थित होते.
ध्वजारोहण सुचना व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री दिपक गायकवाड यांनी आणली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गाढे सर यांनी केले, सदर कार्यक्रमास गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम व्यवस्था श्री संजय पाटील सर, सयाजी गायकवाड सर, परदेशी सर, श्रीमती शोभा जाधव मॅडम, श्रीमती योगिता सोनवणे मॅडम, श्री पवार सर, श्री मुजाळ सर श्री अल्लाउद्दीन पठाण श्री दिलीप वैद्य यांनी केले
