ना गुरुजी,ना 4-जी”अशी अवस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची झाली आहे.   

0

सिल्लोड (प्रतिनिधी:-विनोद हिंगमीरे )  कोरोनाचा ससंर्ग पसरू नये म्हणून अजून पर्यत शहरी व” ग्रामिण भागातील शाळा आणि महाविद्यालय सुरु झाले नाही, बहुतांश विद्यार्थ्यांना शाळेकडुन पाठ्यपुस्तके उपलब्ध झालेली आहे,असे असले तरी शाळा व महाविद्यालय बंद असल्याने शिकवण्यासाठी गुरुजीच नाही, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार,”ना गुरुजी,ना 4-जी”अशी अवस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची झाली आहे.

शासनाने मराठी व इंग्रजी माध्यमापुढे ऑनलाइन शिक्षण देण्याचा (मार्ग)पर्याय सूचवला असला तरी, ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी गुरूजीचीच मानसिकता दिसुन येत नाही,व सिल्लोड शहर वगळता तालुक्यातील दहा बारा मोठी बाजार-पेढेच्याच गावात 4-जी नेटवर्क मिळते व इतर गावात 4-जी नेटवर्क येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे,सिल्लोड शहरासह अजिंठा, शिवना,गोळेगांव, घाटनांद्रा, अंधारी, बोरगांव बाजार, भराडी यासारख्या मोठ्या गावाचा अपवाद वगळता 4-जी नेटवर्कची सर्वत्र अडचणच आहे,तालुक्यातील बहुंताश खेड्यात नेटवर्क जरी असले तरी ते सेवा 2-जी स्पीडच देतात व ऑनलाईन शिक्षण घ्यायचे असले तर अखंडितपणे 4-जी नेटवर्क ची आवश्यकता असणे गरजे आहे, दोन महीन्यापासुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजून शाळा व महाविद्यालय सुरु झाली नाहीत. भविष्यात ते कधी सुरु होतील याची काही खात्री नाही,महाविद्यालय व शाळा सुरू झाले तरी सुध्दा पालक आपल्या मुलांना शाळा व महाविद्यालयात पाठवायला तयार नाही, याचाच फायदा ग्रामिण भागातील गुरूजी घेताना दिसत आहे,कारण शासनाने आँनलाईन शिकवण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला,तरी ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी गुरूजीचीच मानसिकता दिसुन येत नाही,तरी गुगल मीट, युट्युब, झूम व ऑनलाईन ॲपच्यामाध्यमातून विद्यार्थी आपला अभ्यास करू शकतात,परिणामी ऑनलाइन शिक्षणाशिवाय तूर्त तरी पर्याय नाही,त्यासाठी आवश्यक 4-जी नेटवर्क अनेकाचे डोकेदुखीचे कारण ठरत आहे, तालुक्यातील बर्‍याच गावात नेटवर्क सेवा उपलब्ध असली तरीती अखंडीतपणे चालत नसल्याने विद्यार्थी सांगतात,

विशेष म्हणजे सिल्लोड तालुक्यातील प्रत्येक गावात विविध कंपनीचे इंटरनेटचे जाळे पसरलेले असले तरी 4-जी नेटवर्क अपवादानेच पाहायला मिळतात. शिवाय 4-जी नेटवर्क अखंडितपणे चालत नाही,यामुळे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी “ना गुरुजी,ना 4-जी”अशी अवस्था निर्माण झाली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here