सिल्लोड ( प्रतिनिधी-विनोद हिंगमीरे ) सिल्लोड पिंपळगाव घाट झालेल्या जोरदार पाऊसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या पाऊसामुळे नारायण आनंदराव खेबडे गट.नं.79 यातील 20 बाय 15 शेततळे बांधले होती व लागवड केलेली मका,सोयाबीन संपुर्ण 40 गुठ्ठे संपूर्ण पणे भुईसपाट झाले आहे शेततळ्याचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे या पावसामुळे ते संपुर्णपणे फुटुन गेले आहे शासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे अजुनपर्यत त्या शेततळ्याचे पंचनामे झालेली नाही प्रशासन गाढ झोप घेत आहे का अशा प्रशन शेतकर्यांना पडला आहे या झालेल्या पाऊसामुळे आमचे शेतीचे व शेततळ्याचे मोठे नुकसान झाले आहे आद्यपर्यत त्या शेतीचे व शेत तळ्याचे पंचनामा झालेले नाही
शासनाने कोणतेही दखल घेतली नसून विजय पवार संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष यांनी या ठिकाणी पाहणी केली असून शेतकर्यांना योग्य ते नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे,
पिंपळगाव घाट येथील कुषी सहाय्यक यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की आम्हाला पंचनाम्याचे आदेश नसून आद्यपर्यत शेततळ्याचे पंचनामे झाले नाही आदेश आल्यानंतर आम्ही त्या शेततळ्याचे व जमिनीचे पंचनामे करण्यात येईल.