शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवाना राखी बांधून रक्षा बंधन सण साजरा

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :- विनोद हिंगमीरे ) कोणताही सण , उत्सव किंवा सद्या कोरोनाच्या लढाईत जीवाची बाजी लावून लढणाऱ्या पोलिसांप्रति प्रत्येकाच्या मनात कृतज्ञतेचा भाव असतो. रक्षा बंधनाच्या निमित्ताने ही कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी शिवसेना महिला आघाडीला लाभली. पोलीस बांधवाना दीर्घायुष्य लाभो तसेच देशातील कोरोनाचे संकट लवकरच दूर व्हावे यासाठी पोलीस बांधवांना बघिणींकडून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शिवसेना नगराध्यक्षा राजश्री निकम, माजी उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, रुग्णकल्याण समितीच्या सदस्या दीपाली भवर, शिवसेना महिला आघाडीच्या मेघा शाह, सुकन्या भवर, सिद्धी भवर, स्नेहल कारले यांच्यासह पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे व पोलीस बांधवांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here