भारत रक्षा महिला मंचचे चीनी बनावटीच्या राख्यांची विक्री न करण्याचे अवाहन

0

पनवेल : लदाख मधील गलवान क्षेत्रात नुकताच चीनने भारताविरोधात कुरघोडी करीत युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली होती. चीनला भारताने जशाच तसे उत्तर दिल्यांनतर चीनने नमते घेतले. चीनला संपूर्ण देशाने जशाच तसे उत्तर देण्याची हि वेळ आहे. देशातील प्रत्यके नागरिकाने याकरिता आपले योगदान देणे गरजेचे आहे. याकरिताच भारत रक्षा मंचच्या वतीने व्यापारी बांधवाना चीनी बनावटीच्या वस्तुवर बहिष्कार घालण्याचे आवाहन दि .28 रोजी केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
रक्षाबंधन सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणाऱ्या या सणावर पूर्णपणे चिनी बाजारपेठेने कब्जा केला आहे. मोठ्या प्रमाणात चिनी बनावटीच्या राख्या आज बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या चिनी बनावटीच्या वस्तु आपण खरेदी केल्यास हा पैसे चीनकडे जात असतो .अशावेळी चीन या पैशाचा वापर आपल्याच विरोधात शस्त्र तसेच युद्धात वापरल्या जाणाऱ्या विविध उपकरणांसाठी करीत असतो. याकरिताच चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची हि वेळ आहे. याकरिता भारत रक्षा मंचच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा व भाजपा खारघर-तळोजा मंडल उपाध्यक्षा सौ. बिना गोगरी यांच्या वतीने नवी मुंबई मधील खारघर शहरातील व्यापाऱ्यांना चिनी बनावटीच्या राख्या तसेच इतर वस्तुंवर बहिष्कार टाकण्यासाठी निवेदन देण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी देशाला ‘आत्मनिर्भर भारत’ चा नारा दिला आहे. जर भारतीय उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध झाली तर त्याने आपल्या देशात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील व भारताच्या अर्थव्यवस्थेला ही मजबूत करण्यात मदत होणार असून व्यापा-यांनीच चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकल्यास सर्वसामान्यांपर्यंत या वस्तू पोहचणार नसल्याने आम्ही या संदर्भात थेट व्यापाऱ्यांनाच निवेदन दिले असल्याचे यावेळी बिना गोगरी यांनी सांगितले.
चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी भारत रक्षा मंचच्या वतीने जनजागृती माहीम प्रत्यक्ष तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे ही अशीच राबविली जाणार असून राज्यभरातील व्यापारी संघटनांना आम्ही निवेदन देणार असल्याचे यावेळी बिना गोगरी यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत अंजु पटेल या ही उपस्थित होत्या. सुशीला शर्मा, निर्मला यादव, नीता गोगरी, अल्पना डे, रेखा श्री श्री माल, स्मिता आचार्य, हंसा पारधी, इत्यादि महिलांच्या सहकार्याने ही मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here