सिल्लोड ( प्रतिनिधी – विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालूक्यातील आधरवाडी येथील अंबादास पूंजाजी वाघमोडे वय ४० हे दि १८ शनिवारी केळगाव येथे सायंकाळी सामान आणण्यासाठी गेले होते त्यादिवशी परिसरात मूसळधार पाऊस पडत होता वाघमोडे हे केळगाव येथून सामान घेऊन आधरवाडी येथे जात असतांना केळगाव आधरवाडी रस्त्यावरील पूलावरून पूर चालू असतांना वाघमोडे यांना पूराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले त्यानंतर हि माहीती कळताच ग्रामस्थांनी शोध घेतला परंतू त्यांचा शोध लागला नव्हता परंतू दि २५शनिवारी रोजी तब्बल आठ दिवसांनी दूपारी सदरील इसमाचा मृतदेह केळगाव येथील धरणात सापडला सदरील माहीती परिसरातील नागरिकांनी ग्रामीण पोलीस ठाणे सिल्लोड यांना कळवली माहीती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे स पो नि किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार देविदास जाधव सचिन सोनार यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा करून प्रेत सिल्लोड ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला सदरील घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आला असून पूढील तपास बिट जमादार देविदास जाधव हे करीत आहे,