मुंबईत मुसळधार पावसासाठी अलर्ट जारी

0

मुंबईत – मुसळधार पावसासाठी  अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज संध्याकाळी जोरदार भरती येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मुंबई व त्याच्या आसपासच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी रात्रीही मुंबई व आसपासच्या भागात अधून मधून पाऊस पडला आहे. आयएमडीने (भारतीय हवामान खात्याने) 15 जुलैसाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येथे मंगळवारी उत्तर भारतातील भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्याच बरोबर आयएमडीने मुंबई, ठाणे, पालघर आणि महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.मुंबईतील पश्चिम उपनगरात अंधेरी, विलेपार्ले, गोरेगाव, दहिसर, बोरिवलीत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणामराज्यातील बहुशांत भागात आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार सरींची शक्यता वर्तवली आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार, “दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. यानुसार 15 ते 17 जुलैपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.”खरंतर जून महिन्यात ओढ घेतलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. आज (15 जुलै) आणि उद्या (16 जुलै) मुंबई, ठाणे पालघर, कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.पावसाच्या दीर्घकालीन विस्तारित पूर्वानुमानानुसार दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून, नंतरच्या दोन आठवड्यांमध्ये मराठवाड्यात पावसाचं प्रमाण काहीसं कमी होणार आहे. मात्र, इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे.रम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत आजही पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाने दमदार बॅटिंगला सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासात, डहाणू 128 मिमी, कुलाबा 121.6 मिमी, सांताक्रुज‌ 96.6 मिमी, रत्नागिरी 101.3 मिमी, अलिबाग 122.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.काल सकाळी रिपरिप असलेला पाऊस दुपारी मुसळधार बरसला. मुंबईत लोअर परळ, वरळी, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल या भागात जोरदार पाऊस होता. तर उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस पडला. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here