म.रे. माध्यमिक विद्यालयात 98 शालेय वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

0

मनमाड – मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयात शाळेचा 98 वर्धापन दिन कोरोना संदर्भात सर्व नियमाचे पालन करून साजरा करण्यात आला, या प्रसंगी व्यासपीठावर श्री, विकास दादा काकडे, डॉ, सुनील शास्त्री टीव्ही कुलकर्णी खांदात,प्रजेश, श्री, गवळे, पत्रकार आजाद आव्हाड, प्रभारी मुख्याध्यापक श्री प्रफुल्ल देशपांडे सर होते, या मान्यवरांनी सरस्वती तात्यासाहेब सप्रे डॉक्टर चंद्रभान यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले प्रास्ताविकात श्री, हर्षद गद्रे सरांनी शाळा 99 वर्षात पदार्पण करीत असल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच शाळेसंबंधी च्या स्फूर्तीदायक जुन्या आठवणी त्यांच्या व्हाट्सअप लेखनातून उजळा दिला,डॉक्टर सुनील बागरेचा यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या संकट काळात बागरेचा परिवार नेहमीच शाळेत बरोबर असणार आहे, अशी भावना व्यक्त केली शाळेचे संचालक श्री विकास दादा काकडे यांनी शाळेच्या सर्व घटकांना तसेच विद्यार्थी व पालकांना शुभेच्छा दिल्या व आपण सर्वांच्या सहकार्याने सदिच्छेने येणाऱ्या काळात आपण मार्ग काढू अशी आशा व्यक्त केली , कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ संचालक डॉक्टर चंद्रभानजी बागरेचा व चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here