0

गोवा : गोवा इथे आयोजित दुसऱ्या G20 आरोग्य कार्य गटाच्या बैठकीच्या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि केंद्रीय पर्यटन,बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले संबोधित. डॉ. भारती प्रवीण पवार यांनी भारताचे प्राधान्यक्रम आणि जागतिक आरोग्य सज्जतेमध्ये योगदान यावर भर देताना सांगितले. “ एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” ही भारताच्या जी20 अध्यक्षतेची संकल्पना विशेष्ट उद्देशाने एकजुटीचे आणि कृतीचे महत्त्व स्पष्ट करते या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचा त्यांनी पुनरुच्चार केला आणि कोणीही वंचित राहणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी प्रतिरोधक आरोग्य सेवा प्रणालीची उभारणी, सर्वांना समानतेने होणाऱ्या लसींच्या उपलब्धतेचे, निदानाचे आणि उपचारांचे पाठबळ यासाठी सध्या सुरु असलेल्या विविध उपक्रमांचे एकीकरण करण्यासाठी देश झटत आहे, असे त्या म्हणाल्या. जागतिक आरोग्य क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या विचारमंथनामुळे मिळालेल्या चालनेचा फायदा घेण्याची आणि सहकार्यकारक देखरेख, समुदायाचे रक्षण, वैद्यकीय उपाययोजना आणि आकस्मिक समन्वय यावर भर देण्याची गरज डॉ. पवार यांनी व्यक्त केली. यापुढची आपत्ती आपल्याला कधी तडाखा देईल हे आपल्याला खात्रीने सांगता येणार नाही. आयएनबी प्रक्रिया किंवा आयएचआर सुधारणा यांच्या निष्कर्षांसाठी ती थांबणार नाही.”, जागतिक वैद्यकीय वैद्यकीय प्रतिबंधात्मक समन्वय मंचाव्यतिरिक्त भावी आरोग्यविषयक आकस्मिक व्यवस्थापन, संशोधन आणि विकासाचे जाळे आणि लसी आणि औषधांचे उत्पादन यांच्याबाबत सहमती निर्माण करण्याच्या आवश्यकतेवर भर देताना पवार यांनी नमूद केले.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली व मा.केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया जी यांच्या मार्गदर्शनाखाली जगाला एक विस्तारित कुटुंब बनवण्याची कल्पना दिली आहे. आमच्या उपनिषदांमध्ये समाविष्ट असलेल्या “वसुधैवकुटम्बकम” या तत्त्वांद्वारे आम्हाला मार्गदर्शन केले जात आहे असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here