फत्तेपूर येथील आठवडे बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

0

फत्तेपूर/प्रतिनिधी

4 मेपासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. काही सवलती मिळाल्या मात्र रेडझोनमध्ये कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. उलट निर्बंध अधिक कडक करण्यात आलीत. इकडे जळगाव जिल्हा रेडझोन मध्ये आहे म्हणजे जिल्ह्यातील सूर्वच गावे मार्केट, रस्ते रेडझोनमध्ये आलेत.
असे असतांना आज सोमवार फत्तेपूर गावच्या आठवडे बाजारचा दिवस आणि आजच लॉकडाऊन सुरू झाले. मात्र फत्तेपूर व परिसरातील लोकांची गर्दी पाहून असे वाटते की जणू काय लॉकडाऊन उठलाच! भाजी विक्रेत्यांची गर्दी , गिर्‍हाईकांचही गर्दी कोठेही सोशल डिस्टंटस नाही. तुरळक लोकांच्या तोंडाला मास्क, मोटार सायकलवर डबल-टिबल सिटचा प्रवास, प्रवासगाड्यांची भरभरून ये-जा सारे लॉकडाऊन उठल्याप्रमाणे.
एखादा पोलीस फिरकतांना दिसला मात्र त्याचे ऐकते कोण? ग्रामपंचायतीने गाडी फिरवून सूचना दिल्या. मास्क नसणार्‍यांना दोनशे रूपये दंड केला जाईल मात्र एकालाही दंड झाल्याचे दिसत नाही सावलीचा आसरा घेऊन दिवसभर थांबणारे विक्रेते आरे आलबेल!
पोलीसांची गस्त वाढवून यांना सावरावे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्यास जबाबदार कोण? असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here