विजय हा आपला निश्चित

0

मनमाड : विजय हा आपला निश्चित आहे पण विजय मधील फरक हा मोठ्या फरकाने असला पाहिजे यासाठी आपण कामाला लागले पाहिजे.या निवडणुकीत मोठी उसळी मारयाची आहे यासाठी तिन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे” असा कानमंत्र ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी झालेल्या बैठकीत झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी दिला. दि मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड च्या २०२३च्या निवडणूकीत ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड, सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ मनमाड व ऑल इंडिया ओ बी सी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड यांची युती झाली आहे. झोनल सचिव सतिश भाऊ केदारे,हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे विजय गेडाम,सी.आर.एम.एस.चे झोनल कार्यकारिणी सदस्य एकनाथ पाटील,सी.आर.एम.एस.चे कारखाना शाखा अध्यक्ष प्रकाश बोडके, कारखाना शाखा चे सचिव नितीन पवार, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष महेंद्र चौथमल, कारखाना शाखा चे कोषाध्यक्ष मुख्तार शेख,ओ.बी.सी.असोसिएशनचे कारखाना शाखा चे अध्यक्ष रतन निकम यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनल तयार करण्यात आले. या पॅनल च्या उमेदवारांचा परिचय व प्रचार बैठक असोसिएशन च्या ओपन लाईन कार्यालय मनमाड येथे संपन्न झाली. यावेळी सी.आर.एम.एस.झोनल कार्यकारिणी सदस्य एकनाथ पाटील, असोसिएशन झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम,दि सेन्ट्रल रेल्वे कंन्झुमर्स को-ऑपरेव्ह सोसायटी लिमिटेड मनमाड चे चेअरमन रत्नदिप पगारे, सी.आर.एम.एस.चे कारखाना शाखा चे अध्यक्ष प्रकाश बोडके,सी.आर.एम.एस.चे कारखाना शाखाचे सचिव नितीन पवार,सी.आर.एम.एस.कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष महेंद्र चौथमल, असोसिएशन कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड,सी.आर.एम.एस.कारखाना शाखा चे कोषाध्यक्ष मुक्तार शेख,ओ.बी.सी.असोसिएशन कारखाना शाखाचे सचिव शशिकांत आढोकार,ओ.बी.सी.असोसिएशन कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष संजय कातकडे,ओ.बी.सी.असोसिएशन कारखाना शाखा चे कोषाध्यक्ष रामधनी यादव, वरिष्ठ उपाध्यक्ष दिलिप बोरसे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे विद्यमान सचिव संदीप धिवर, असोसिएशन कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे आदी उपस्थित होते. यावेळी संदिप धिवर,सचिन इंगळे, वैभव कापडे, रत्नदिप पगारे, प्रकाश बोडके, एकनाथ पाटील, सिद्धार्थ जोगदंड, नितीन पवार, शशिकांत आढोकार आदी चे भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद झोंबाड यांनी केले तर आभारप्रदर्शन हेमंत सांगळे यांनी केले. प्रगती पॅनल चे अधिकृत उमेदवार खालीलप्रमाणे प्रगती पॅनल ज्युनिअर इन्स्टिट्यूट निवडणूक २०२३ (१) किरण वाघ – सेक्रेटरी (२) गणेश हाडपे- खजिनदार
(३)शशिकांत अढोकार- संचालक (४) प्रशांत ठोके – संचालक (५) इच्छाराम माळी- संचालक
(६)ज्ञानेश्वर आहेर – संचालक (७)विकास अहिरे – संचालक (८)विलास कराड – संचालक
(९)साईनाथ लांडगे – संचालक यावेळी निवडणूक प्रचार समितीत झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड,सी.आर.एम.एस.चे कारखाना शाखा अध्यक्ष प्रकाश बोडके,सी.आर.एम.एस कारखाना शाखा चे सचिव नितीन पवार, कोषाध्यक्ष मुक्तार शेख, कार्याध्यक्ष महेंद्र चौथमल,सी.आर.एम.एस.चे युवा अध्यक्ष वैभव कापडे, सचिव सोमनाथ सणस,ओ.बी.सी.कारखाना शाखांचे अध्यक्ष रतन निकम,ओ.बी.सी.असोसिएशन कारखाना शाखा चे सचिव शशिकांत आढोकार, कोषाध्यक्ष रामधनी यादव,ओ.बी.सी.असोसिएशनचे कार्याध्यक्ष संजय कातकडे, वरिष्ठ उपाध्यक्ष दिलिप बोरसे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप आदीचा समावेश करण्यात आला. २४ जानेवरी २०२३रोजी मतदान होणार आहे.तर मतमोजणी दि.२४ जानेवारी 20२३रोजी होणार आहे व त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.
यावेळी सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ मनमाड, ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड, ऑल इंडिया ओ बी सी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here