
निफाड
: निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी श्री बाबाजींच्या ३३ व्या पुण्यस्मरण निमित्ताने प.पू.श्री.श्री. १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने ओझर ता. निफाड येथे आयोजित राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा व ध्वजारोहन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या भव्य सोहळ्याला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भेट देऊन उपस्थित भाविकांना सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
