
मनमाड : नागपुर ते नाशिक अश्या पसरलेल्या रोटरी डिस्ट्रीक्ट चे गर्व्हनर प्रख्यात ओपथ्या्ल्मोलोजिस्ट डॉ.आनंद जुंजूनुवाला यांनी नुकतीच मनमाड रोटरी क्लबला ॲाफ़िशल भेट दिली. मनमाड शहराच्या विविध समस्या जाणुन घेत पुढील काळात मनमाड शहराचे महत्व लक्षात घेता पाण्याचे नियोजन करण्यासाठी रेन वॅाटर हार्वेस्टींग करण्याचे आवाहन करण्यात आले. रोटरी मार्फ़त मनमाड़ मध्ये सिग्नेचर प्रोजेक्ट करण्याचे सांगण्यात आले.
रोटरी क्लब मार्फत आजवर करण्यात आलेले कामे व पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात आले. मनमाड मधील इंजीनियर असोसिएशन चे जिल्हाअध्यक्ष मुराद शेख यांच्यातर्फे रोटरी क्लब च्या कार्यक्रमांना दुजोरा देण्यात आला.
डॉ.बाग़रेचा, रोटरी आय हॅास्पिटल मालेगाव व आनंद धर्मार्थ दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने दरमहिन्याच्या पहिल्या मंगळवारी घेण्यात येत असणारा आय चेकअप व कॅटरॅक्ट सर्जरी कॅंप चे काम वाखणण्यात आले. डी ज़ी डॉ.आनंद जुंजूनुवाला व टीम चे स्वागत वड व पिंपलाचे रोपटे देऊन करण्यात आले. सदर प्रसंगी डिस्ट्रिक्ट सेक्रेटेरी रोटे.राकेशजी डिड़वानिया, असिस्टंट गर्व्हनर रोटे.शिवनारायण काकाणी, डिस्ट्रिक्ट जॅाईंट सेक्रेटेरी रोटे.लौकुमार माने,प्रेसिडेंट रोटे.स्वप्निल सुर्यवंशी,सेक्रेटरी डॉ.सुमित शर्मा सहित मनमाड़ रोटरी क्लब मेंबेर्स, महिला क्लब मेंबेर्स, समाजातील विविध मान्यवर आदि. उपस्थित होते.
