
मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडल चे सहाय्यक सचिव आयु.अर्जुन बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय गेडाम, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, पत्रकार अमिन शेख, फुले-शाहू-आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे कार्याध्यक्ष फिरोज भाई शेख,R.P.I.(आठवले गट)चे युवा तालुका अध्यक्ष गुरू निकाळे, संजयभाऊ कटारे, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट मनमाड चे सचिव संदीप धिवर,दि सेन्ट्रल रेल्वे कंन्झुमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी मनमाड चे सदस्य प्रेमदिप खडताळे, कल्याण धिवर आदी उपस्थित होते.
तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन शरद झोंबाड यांनी केले तर आभारप्रदर्शन पंढरीनाथ पठारे यांनी केले.यावेळी सतिश भाऊ केदारे, अमिन शेख फिरोज भाई शेख,शकुर शेख, संजय कटारे, संदिप धिवर, गुरू निकाळे, अर्जुन बागुल आदी चे भाषणे झाली.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अर्जुन बागुल यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा चे कार्यकारिणी सदस्य दिपक अस्वले,किरण वाघ, राहुल शिंदे, राजेंद्र सोनवणे, आदी ने केले.
