
सिल्लोड( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) सिल्लोड तालुक्यातील केळगाव विविध विकास कार्यकारी सोसायटी निवडणूकीत संभाजी ब्रिगेड पॅनलने बाजी मारली आठ जागा जिंकत संभाजी ब्रिगेड या पॅनलने तर शिवसेना या पाच जागेची निवड करण्यात आली आहे या सोसायटीसाठी 8 ते 4 मतदान झाले व त्यानंतर मतमोजणी आज शनिवार दि.18 चार वाजेपासून ते सात वाजेपर्यत मतमोजणी करण्यात आली आहे.संभाजी ब्रिगेड व शिवसेना या पॅनलमध्ये सरळ लढत झाली.यात संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष विजय पवार यांच्या नेतूत्वाखालील संभाजी ब्रिगेडने पॅनलने आठ जाग्याची बाजी मारली विजयी उमेदवारामध्ये संभाजी ब्रीगेडचे विजय पवार प्रविण ज्ञाने युवराज पवार,दत्तु मुळे,सोमनाथ मुळे,योगेश शिंदे,,नंदाबाई मुळे,सांडू चव्हाण,हे आठ उमेदवार तर जगन कावले,याधवराव जाधव,बंडू ज्ञाने,सिताराम ईवरे,पार्वताबाई गरुड हे पाच शिवसेना यांचा समावेश आहे,यावेळी निकाल जाहिर होताच कार्यकत्यांनी फटाके फोडून जल्लोश साजरा केला यावेळी संरपच अशोक वाघमोडे,उपसंरपच बबन चव्हाण,तंटामुक्ती अध्यक्ष सर्जेराव पवार,रोहिदास पवार,विशवनाथ शिंदे,रवि मुळे,दत्तु मुळे आदीची अभिनंदन करुन उपस्थिती होती.
