रायगड जिल्हा माहिती भवन उभारणीसाठी शासकीय जागा प्रदान

0

रायगड : – रायगड जिल्हा माहिती भवन उभारणीसाठी शासनाने अलिबागजवळील चेंढरे (पिंपळभाट) येथील शासकीय कार्यालयास जागा प्रदान केली असून, यासाठी आपल्या परिने पाठपुरावा करणारे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचे भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयपाल पाटील व रायगड जिल्हाध्यक्ष सुभाष म्हात्रे यांनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रायगड जिल्ह्यात स्वतंत्र माहिती भवन उभारण्यास मंजुरी मिळाल्याने रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी याबाबत व्यक्त केले आहे.रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी संवादाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आणि संकल्पना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यास हे नियोजित जिल्हा माहिती भवन मोलाची भूमिका बजावणार आहे. अलिबाग चेंढरे (पिंपळभाट) येथील 15 गुंठे शासकीय जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या या अद्ययावत माहिती भवनामध्ये मिनी थिएटर, मिनी स्टुडिओ, माहिती व तंत्रज्ञान कक्ष, प्रदर्शन दालन, विविधोपयोगी सभागृह, डिजिटल वाचनालय, मीडिया संनियंत्रण कक्ष, प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी अद्ययावत प्रसारमाध्यम कक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र आदी व्यवस्था असणार आहेत.जिल्हा माहिती भवनाच्या निर्मितीसाठी अत्यंत मोलाची भूमिका व गतिमान कार्यवाही राज्य शासनाकडून होत आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे पालकमंत्री कु. तटकरे यांनी आवर्जून आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here