नेवाशाची अपहरण झालेली मुलगी बालसुधारगृहात तर अपहरणकर्ता आरोपी अलीम शेख बलत्काराच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर)
नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील आंतरवाली येथील धनगर समाजातील अल्पवयीन मुलीचे ५ मे २०२२ रोजी अपहरण करण्यात आले होते.गावातच राहणारा संशयित आरोपी अलीम राजू शेख(वय२२) याच्या वर मुलीच्या पालकांनी संशय व्यक्त केला होता.अहमदनगर गुन्हा अन्वेषण शाखेचे अनिल कटके आणि नेवाशाचे सपोनि ज्ञानेश्वर थोरात यांच्या संयुक्त पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवून संशयित आरोपी अलिम राजू शेख याच्या मोबाईल लोकेशन वरुन गोव्यातील कोलवा बीच येथून गोवा पोलिसांच्या मदतीने अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपीला अल्पवयीन मुलीसह गोव्यातून ताब्यात घेण्यात आले होते.त्याला नेवासा पोलीस ठाण्यात हजर करून त्याच्या विरुद्ध कलम ३७६ बलत्कार आणि बाललैंगिक अत्याचार (पोस्को) अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.त्याला नेवासा कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि.२७ मे२०२२ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या तपास पथकात स.पो.नी.गणेश इंगळे,दत्ता गव्हाणे,मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, सुरेश माळी, संदिप दरंदले,रवी सोनटक्के,फुरखान शेख,महिला पो.काँ.सारिका दरेकर, संभाजी कोतकर यांचा समावेश होता. या प्रकरणी भाजपचे विधान परिषदेतील धनगर समाजाचे नेते आमदार गोपिचंद पडळकर यांनी ग्रुहमंत्री ना.वळसे पाटील आणि अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना फोनकरून अपहरण झालेल्या मुलीचा दोन दिवसात तपास लावावा आणि नेवाशाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना मुलींच्या नातेवाईकांना शिविगाळ आणि आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी निलंबित करण्याची मागणी केली होती.तपास न लागल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. या अपहरण प्रकरणात नेवाशाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी कुकाण्याच्या एका दलाल पत्रकारा मार्फत सव्वा लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप मुलीचे आजोबा जानकू कोकरे यांनी पत्रकार परिषदेत केला होता.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निरिक्षक बाजीराव पोवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविले असुन त्यांची उप अधिक्षका मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी नंतर काही दोष निश्पन्न झाल्यास पोवार यांच्या वर कारवाई करण्यात येईल असे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे.आरोपी कडून या प्रकरणी सहभागी असनाऱ्यांची नावे समजताच पोलिसांची धरपकड मोहीम सुरु होणार आहे.आता नेवाशाच्या पोलीस निरीक्षक पदी पुन्हा पुर्वीचे वादग्रस्त म्हणून ठरलेले आणि बदली केलेले पोलिस निरीक्षक विजय करे यांचीच नेमनुक केली आहे. या बदलीमुळे नेवासा पोलीस स्टेशन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडते की काय अशी नागरिकांत चर्चा सुरू आहे.(प्रतिनिधी सुनिल नजन/ स्पेशल क्राईम रिपोर्टर अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here