अजिंठा घाटात ट्रँव्हल बस चे ब्रेक निकामी झाल्याने बस डोंगराला धडकली २५ प्रवासी थोडक्यात बचावले

0

सिल्लोड(प्रतिनिधी) विनोद हिंगमिरे: अजिंठा घाटात
ट्राँँव्हल बस चे ब्रेक निकामी झाल्याने बस डोंगराला जाऊन धडकली यात जिवितास हानी झाली नसून २५ प्रवासी बचावले आहे या घटने ची फर्दापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे,या बाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशिकी श्रिदुर्गेश ट्रँव्हल बस हि काल दिं.२७ रोजी पुणा येथुन २५ प्रवासी घेऊन जळगाव येथे जात असतांना आज सकाळी ६ च्या सुमारास अजिंठा घाटात पोहचली घाटात रस्ता अत्यंत खराब आहे व मोठ मोठे खड्डे पडलेले आहे ते वाचवत असतांना बस चे ब्रेक निकामी झाले व बस दरीत कोसळनार तोवर चालक विजय पाटील रा.जळगाव याने वेळीच नियंत्रण साधुन बस डोंगराच्या दिशेने वळवली व बस डोंगराला धडकली यात कोनालाही दुखापत झाली नसुन बस चे मोठे नुकसान झाले आडकलेल्या बस मुळे रोड वरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता म्हणून फर्दापूर पोलिस ठाण्याचे जमादार बाजीराव धनवट .सचिन केंद्रे.धनराज खाकरे यांनी बस क्रेन च्या सहाय्याने बहेर काढून वाहतूक सुरळीत केली या घटनेची फर्दापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here